

बेळगाव : मोटार व मालवाहू टेम्पोमध्ये भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात सात कामगार जागीच ठार तर दोन्ही वाहनांतील २३ जण जखमी झाले. शुक्रवारी (२) रात्री सौंदत्ती शहराबाहेर हा अपघात घडला.
मारुती तम्मण्णा पुजारी (वय ३१, रा. इटनाळ, ता. रायबाग), हनमव्वा मायाप्पा बोमण्णावर (वय, ५०), भीमव्वा सिद्दाप्पा नरी (वय ३८), यल्लव्वा यल्लाप्पा मुर्कीभावी (वय ६०) पारव्वा सुरेश हुरळी उर्फ गुडी (वय ३५), रूकमव्वा सिद्दाप्पा वडेन्नावर (वय ३५) यल्लम्मा खानप्पा दोडवाड (वय ६० सर्वजण रा. चिंचनूर ता. रामदुर्ग) अशी मृतांची नावे आहेत. जखमींबद्दल अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
हेही वाचा - मग, सेलिब्रिटींचे चॅट ‘लिक’ झाले कसे?
रात्री उशिरापर्यंत जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. अपघातातील मयत एकजण रायबाग तालुक्यातील तर सहा मृत रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावचे रहिवासी आहेत. धारवाड जवळील मोरब येथे कामानिमित्त गेलेले कामगार काम आटोपून पुन्हा आपल्या गावाकडे मोटारीतून जात होते. मोरबकडून सौंदतीमार्गे रामदुर्गकडे येत असताना सौंदतीनजीक हा अपघात घडला.
धारवाडकडे जाणारी टेम्पो आणि सौंदतीकडे जाणाऱ्या मोटारीमध्ये हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांताल सातजण जागीच ठार झाले तर २३ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी व सौंदती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्व जखमींची नावे समजू शकली नाहीत.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.